Get Mystery Box with random crypto!

मलबार किनारपट्टी हे गोवा ते कन्याकुमारी यामधील किनारपट्टीचे ना | MPSC Geography

मलबार किनारपट्टी हे गोवा ते कन्याकुमारी यामधील किनारपट्टीचे नाव आहे.

◆मलबार किनारा :-
मलबार किनारा हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षिणतम भाग म्हणून ओळखला जातो.
◆  हा किनारा पूर्वेकडे पश्चिमघाट व पश्चिमेकडे अरबी समुद्र यांच्यामध्ये आहे.
◆ हा किनारा वाळूच्या उंचवट्याचा पट्टा आहे. अनेक लहान लहान खार्‍या पाण्याचे उथळ जलाशय या किनार्‍याला आतील बाजूस आहेत.
◆ हे जलाशय लहान कालव्यांनी परस्परांना जोडली गेल्यामुळे त्याचा उपयोग प्रवासासाठी व मालवाहतुकीसाठी सर्रास केला जातो.
◆ किनार्‍याचे कोची (पूर्वीचे कोचीन) हे मुख्य बंदर आहे.