Get Mystery Box with random crypto!

● कोरोमंडल कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर् | MPSC Geography

कोरोमंडल

कॉरोमांडल, कॅलिमीर, भूशिरापासून पेन्नरच्या मुखापर्यंतच्या भारताच्या पूर्व किनाऱ्यास कोरोमंडल किनारा म्हणतात. कोरोमंडल नावाच व्युत्पत्तीबद्दल अनेक मते आहेत. चोलामंडलम्‍चा (चोलांच्या राज्यातील प्रदेश) अपभ्रंश होऊन कोरोमंडल नाव पडले असणे शक्य आहे. या सु. ७२५ किमी.
लांबीच्या किनारपट्टीचा काही भाग हल्ली तमिळनाडूत आणि काही आंध्र प्रदेशात आहे. समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व घाटापर्यंतचा हा प्रदेश सपाट असून किनारा दंतुर नसल्यामुळे यावर नैसर्गिक बंदरे नाहीत. नेगापटम्, पाँडिचेरी, मद्रास ही या किनाऱ्यावरील प्रमुख बंदरे मानवनिर्मित असून दरवर्षी त्यांवर लाखो रुपये खर्च होतो. पुलिकत हे खारकच्छ या किनाऱ्यावर असून त्यातील बेटांवर चुना तयार करण्याचा उद्योग चालतो.