Get Mystery Box with random crypto!

◆ जैविक घटक ◆  • खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो; प | MPSC Geography



◆ जैविक घटक ◆

 • खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो; परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे.

• मृदेमध्ये खडकाच्या भूग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात.

•वनस्पतींची मुळे,पालापाचोळा ,
प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात ,तसेच  त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते.

• उदा गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या. अशा विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात.

• मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल, तर मृदा सुपीक असते.

• अनेक जीवांमार्फात विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग मोठया प्रमाणात केले जातात.