Get Mystery Box with random crypto!

कल्याण करी रामराया  जनहित विवरी || धृ || तळमळ तळमळ होतची आहे  | Mythological Fact

कल्याण करी रामराया 
जनहित विवरी || धृ ||

तळमळ तळमळ होतची आहे 
हे जन हाति धरी  || १ ||

अपराधी जन चुकतची गेले 
तुझा तूचि सावरी || २ ||

कठीण त्यावरी कठीण जाले 
आतां न दिसे उरी || ३ ||

कोठे जावे काय करावे 
आरंभिली बोहली || ४ ||

दास म्हणे आम्ही केले पावलो 
दयेसी नाहीं सरी || ५ ||