Get Mystery Box with random crypto!

*मौका - मौका* कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता. कहीं ज़मीन | 🏹आदित्य अकॅडमी🏹

*मौका - मौका*

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता.
कहीं ज़मीन तो कहीं आसमाँ नहीं मिलता.

आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल. कधीकाळी मलाही ही गझल माझ्याही खूप जवळची होती. पण आज ज्या ज्या क्षेत्रात मी काम करत आहे, तिथे अशा निराशावादी भावनेला अजिबात स्थान नाही. बस्स मला जिंकायचे आहे हा एकमेव ध्यास लागलेला असतो. अर्थातच फक्त बोलून काही होत नाही यासाठी प्रयत्नही करावे लागतात. काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात तर काही गोष्टी ज्यात आपण मास्टर्स असतो त्यांना सतत धार लावावी लागते.

मित्रांनो, विषयांतर न करता मूळ मुद्दा असा आहे की, राज्यसेवा २०२१ची जाहिरात आपण सगळ्यांनी पाहिली आहे. प्रशासनात गेल्या ५ वर्षापासून कमी वयात सर्व्हिसला लागलेले विद्यार्थी कौटुंबिक किंवा इतर काही कारणांमुळे जे काम सध्या करत आहे त्यातच खूश आहे. विशेषत: गृप D ते गृप B पदावर काम करत असलेले विद्यार्थी. आपल्या सर्वांना मनातून कुठेतरी वाटत असते काश! एक मौका मिला होता तो आज क्लास १ होते. पण आपण संधीची वाट पाहत गेली ५/६ वर्षे गमावली आहेत.

आपण मागील काही वर्षात ज्या संधीची वाट पाहत आहात ती ही एकमेव व शेवटची संधी आहे. या जाहिरातीत क्लास १चा जागा भरपूर आहेत. लक्षात घ्या २०२२ ला आयोगाचा २०१२मध्ये बदललेल्या अभ्यासक्रमास १० वर्षे पूर्ण होत आहे. म्हणजेच पुढील परीक्षेत अभ्यासक्रमात अनेक बदल घडू शकतात. आणि तो बदल अभ्यासात गॅप पडलेल्या विद्यार्थ्यांना सहन होईलच असे नाही. तेव्हा हीच ती सुवर्णसंधी आहे जिचे सोने करता येण्यासारखे आहे.

आयुष्य कुढत जगण्यापेक्षा स्वत:ला एक संधी द्यायला काहीही हरकत नाही. आपल्या मुलांना दुसऱ्यांची उदाहरणे देण्यापेक्षा आपली स्वत:चीच स्टोरी अधिक प्रेरणा देईल यात काही शंका नाही.

नक्कीच हा निर्णय थोडा सामाजिक जबाबदारी झटकण्यासारखा आहे. आपल्यातील अनेकांना आजही नोकरीसाठी दर दर की ठोकरे खावी लागत आहे. अशावेळी आपण अजून एक चान्स घेत प्रयत्न करायचा म्हणजे त्यांच्या जागा अडविण्यासारख्या आहे. पण मित्रांनो इथे डार्विनचा सिध्दांत लागू होतो. “It is not the strongest of the species that survive, or the most intelligent, but the one most responsive to change.”

"पहिले स्वत: मजबूत बना मग इतरांना घडविण्यासाठी स्वत:पेक्षा जास्त प्रयत्न करा." हे वाक्य ज्यांना पटत असेल त्यांनाच ही परीक्षा देण्याचा नैतिक अधिकार आहे. इतरांनी तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे 'ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान' समाधानी रहावे. उगाचच स्वत:वर आणि जगावर उपकार करण्याच्या दुनियादारीत पडू नये.

If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story.

- दीपक गायकवाड
आदित्य अकॅडमी
संपर्क:- 9763600585