Get Mystery Box with random crypto!

प्रति, मा. सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई - ४०००२१ परीक्ष | Civil engineering government exam

प्रति,
मा. सचिव
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
मुंबई - ४०००२१

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०१९.
जाहिरात क्रमांक : १७/२०१९


विषय : स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 2019 या परीक्षेसाठी प्रसिद्ध होणाऱ्या गुणवत्ता यादी मध्ये त्या उमेदवारास मिळणाऱ्या पदाचा उल्लेख करणे बाबत.

माननीय सर,
सर्वप्रथम आपण स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ परीक्षेच्या मुलाखती अत्यंत तातडीने २ फेब्रुवारी २०२२ ला पूर्ण केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.
महोदय सदर परिक्षेची गुणवत्ता यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच या पुर्वी एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या अंतिम निकालात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून Opt Out चा पर्याय देण्यात आला आहे. पण जर उमेदवाराला कोणते पद मिळू शकते हे कळल्याशिवाय Opt Out चा पर्याय कसा स्वीकारेल? सदर परीक्षेमध्ये विविध विभागाचे  वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदांचा समावेश आहे, जर गुणवत्ता यादीत सध्या मिळणारे पद नमूद केल्यास उमेदवार Opt Out च्या पर्यायाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. हा एक बदल केल्याने बहुसंख्य उमेदवारांना फायदा होईल.
आपण वरील मागणीकरिता ती रितसर कार्यवाही करणार अशी आशा आहे. धन्यवाद!

आपला कृपाभिलाषी,