पात्रता भारतीय घटना कलम 165 नुसार महाधिवक्ता पदावर नियुक्त होणार्या पुढील पात्रता असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती भारताची नागरिक असावी. त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केले असावे. संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात. राज्यपालाच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी. उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात. 2.4K views00:52