Get Mystery Box with random crypto!

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _____________ | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________

आठ राज्यांत नवे राज्यपाल
07 July 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• केंद्र सरकारने आठ राज्यांच्या राज्यपाल पदांवर नव्या नियुक्त्यांसह फेरबदल केले आहेत.
• केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे.
• गेहलोत राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील गटनेतेही आहेत. आता त्यांना मंत्रिपद, संसद सदस्यत्व व गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल.
• विशाखापटण्मचे माजी खासदार व भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीबाबू कंभमपती यांना मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे.
• भाजपचे गुजरातमधील नेते मंगुभाई छगनभाई पटेल यांना मध्य प्रदेशचे, तर गोवा विधानसभेचे माजी अध्यक्ष राजेंद्र आर्लेकर यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहे.
• अन्य चार राज्यांत राज्यपालांमध्ये फेरबदल झाले आहेत. मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल केले असून सत्यदेव नारायण आर्य यांना हरियाणाहून त्रिपुराचे राज्यपाल म्हणून पाठवले आहे.
• त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस आता झारखंडचे राज्यपाल होतील.
• संघाचे वरिष्ठ नेते व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हरियाणाचे राज्यपाल होतील.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini