Get Mystery Box with random crypto!

पवित्र प्रणालीद्वारे झालेल्या/होणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर पदां | शिक्षक भरती (TAIT 2022)

पवित्र प्रणालीद्वारे झालेल्या/होणाऱ्या
शिक्षक, शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत संबंधित उमेदवाराचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेसाठी यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. तसेच ही प्रक्रिया विहित मुदतीत पार पाडणे बंधनकारक असणार आहे.

याबाबतचा शासन निर्णय काल जारी झाला असून त्याचा लाभ राज्यातील मान्यताप्राप्त खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालये,अध्यापक विद्यालये आणि विद्यानिकेतन संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे.(सविस्तर माहितीसाठी निर्णयाची प्रत जोडली आहे).

शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती सुस्पष्ट, पारदर्शक, सोपी व सुटसुटीत व्हावी या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे. या सुधारणेमुळे प्रक्रियेसाठी लागणारा एकूण वेळ आणि कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन ती अधिक शिक्षकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यास मदत होईल.