Get Mystery Box with random crypto!

२२ जानेवारीच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या इंग्लिश पेपरसाठी एक | MPSC Positive

२२ जानेवारीच्या संयुक्त मुख्य परीक्षेच्या इंग्लिश पेपरसाठी एक महिन्याचे नियोजन कसे कराल?

यासाठी आवश्यक गोष्टी:-

१. तुमचे ३० दिवस.
२. दररोजचे ४ तास.
३. कुठलेही एक Reference book.(उदा. बाळासाहेब शिंदे/ एम.ज. शेख)
४. कुठलेही एक PYQ bank(उदा. बाळासाहेब शिंदे/ लोकसेवा publication)
५. आणि सर्वात महत्त्वाचे तुमची इच्छाशक्ती.

आपण English grammar चे एकूण १५ आणि Vocabulary चे ६ topics मध्ये विभागणी करुयात.



English grammar:-

1.Noun
2.Pronoun
3.Adjective
4.Verb
5.Adverb
6.Preposition
7.Conjunction & complex-compound synthesis
8.Types of sentences & their transformation
9.Tense
10.Change the voice
11.Direct - Indirect speech
12.Degree
13.Clauses
14.Articles, Punctuation
15.Question tag, Moods


English Vocabulary:-

1.Idioms & phrases
2.Phrasal verbs
3.One word substitution
4.Confusing words
5.Synonyms
6.Antonyms

एका दिवसाचे नियोजन कसे कराल:-
रोज एकूण चार तास English grammar आणि vocabulary साठी देणे.
त्यातील दोन तास English grammar आणि दोन तास English vocabulary साठी.


English grammar करताना:-

दीड तास रोज एक grammar च्या topic ला द्या आणि अर्धा तास त्या topic वरील PYQ साठी.
उदा. आज Noun या topic पासून सुरुवात केली तर दीड तास noun हा topic वाचणे आणि अर्ध्या तासामध्ये noun topic वरील PYQ सोडवणे.
असा रोज एक topic केला तर १५ दिवसांत तुमचे वरील नमूद केलेले सर्व topics कव्हर होवून English grammar संपेल.


English vocabulary करताना:-

यामध्ये सुद्धा दीड तास vocabulary साठी आणि अर्धा तास PYQ साठी.
दीड तास vocabulary करताना वरील नमूद केलेल्या ६ vocabulary चे topics प्रत्येकी १५ मिनिटे म्हणजे एकूण दीड तास करणे.
Vocabulary चे एक विशिष्ट limit ठेवा, म्हणजे कुठल्याही refernce book मध्ये पाहिले तर असे समजेल की One word substitution, phrasal verbs आणि confusing words ची संख्या साधारणपणे २५० ते ३०० असते तर Idioms-phrases, sunonyms आणि antonyms ची संख्या साधारणपणे ४५० ते ५०० असते.
यासाठी, तुम्ही One word substitution, phrasal verbs आणि confusing words साठी प्रत्येकी २० शब्द प्रत्येक १५ मिनिटात करा तर Idioms-phrases, synonyms आणि antonyms साठी प्रत्येकी ३० शब्द प्रत्येक १५ मिनिटात करा.
आणि राहिलेल्या अर्ध्या तासात vocabulary वरील PYQ सोडवा.


एका महिन्याचे नियोजन कसे कराल:-
वरील सांगितल्याप्रमाणे English grammar आणि English vocabulary १५ दिवसांत संपेल, त्याला पुढच्या १५ दिवसांत पुन्हा एक Revision द्या म्हणजे एकूण एका महिन्यात तुमचे दोन वेळा वाचून होईल.
 
English चा अभ्यास करताना काळजी घ्यावयाच्या गोष्टी:-

१. जे refernce book आणि PYQ bank आत्तापर्यंत वाचले आहे त्यालाच वरील सांगितल्याप्रमाणे अभ्यासा.
२.एकाच शब्दावर किंवा एकाच प्रश्नावर(out of the box) फार जास्त वेळ अडकून पडू नका.
३.Vocabulary वाचताना रटाळ किंवा boring वाटेल परंतु त्याला वर सांगीतल्याप्रमाणे दिलेल्या allotted time मध्येच संपवण्याचा  प्रयत्न करा.
४.Mobile मध्ये suitable असे dictionary app असू द्या.
५.Grammar आणि vocabulary वाचताना स्वतःच्या convenient tricks बनवा.(Tricks जितक्या विचित्र तितकं लक्षात ठेवणे सोपे )
६.Grammar आणि vocabulary दोन्ही एकाच वेळी करण्यापेक्षा वेगवेगळ्या वेळी करा जसे की दुपारी दोन तास Grammar आणि रात्री जेवल्यानंतर दोन तास vocabulary.(म्हणजे सलग चार तास रटाळ वाटणार नाही)



Bonus tip:-

नुकत्याच झालेल्या राज्यसेवा English question पेपरचे analysis करा, त्याचा नक्कीच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या २२ जानेवारीला फायदा होईल.

All The Best.


Ramdas Daund Sir
Deputy Collector 2019
ACF 2019
Section Officer 2018
ASO 2018

Join @MPSCpositive