Get Mystery Box with random crypto!

* इतिहासाच्या पानातून.. * * शिवकालीन दिनविशेष | #Mission MPSC


* इतिहासाच्या पानातून.. *

* शिवकालीन दिनविशेष *

* जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते.*

* दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला.* 


* गौरव थोर व्यक्तींचा *

* डॉ जयंत नारळीकर *

* डॉ जयंत विष्णू नारळीकर (१९३३)*

*ज्येष्ठ गणिती व खगोलीय भौतिकी शास्त्रज्ञ. केंब्रीज विद्यापीठ व TIFR या संस्थेतून संशोधन. शांती-स्वरूप भटनागर पुरस्कार, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलिंग पुरस्कार, अडम्स पारितोषिक, पद्मभूषण, फाय फाउंडेशन पुरस्कार, इंदिरा गांधी पुरस्कार, या पुरस्कारांनी सन्मानित*



*आमचे साहित्य*


* पुस्तके व लेखक *

* २६.) १८५७ ची संग्राम गाथा = वि.स.वाळिंबे*

* २७.) कर्मयोग = स्वामी विवेकानंद*

* २८.) गाथा आरोग्याची = डॉ. विवेक शास्त्री*

* २९.) रणांगण = विश्राम बेडेकर*

* ३०.) बटाट्याची चाळ = पु.ल.देशपांडे*