🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

*पेपरफुटी प्रकरण: आरोग्य विभाग मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच | 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

*पेपरफुटी प्रकरण: आरोग्य विभाग मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह पाच जणांना अटक*

@CompetitivePharma
● आरोग्य विभागातील पेपरफुटीप्रकरणी लातूर येथील आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे याच्यासह बीड जिल्ह्यातील पाच जणांना पुणे सायबर पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता ११ वर गेली आहे.
● या प्रकरणाचे धागेदाेरे प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भात असून अटक केलेल्यांमध्ये डॉक्टर, शिक्षक, निवृत्त लष्करी जवानाचा समावेश आहे. दरम्यान, यामागे बडगिरे हाच सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय असून १५ लाख रुपयांपेक्षाही अधिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
● ३१ ऑक्टोबर रोजी राज्यात आरोग्य विभागाची भरती परीक्षा झाली होती. या परीक्षेचा पेपर आधीच फुटल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रारींचा पाऊस पडला होता. @CompetitivePharma
● अखेर आरोग्य विभागाच्या वतीनेच त्याची पुणे सायबर पोलिसात तक्रार झाल्यानंतर तपासाला वेग आला. यापूर्वी घोटाळ्यात जालना जिल्ह्यातील ३ तसेच औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एकासह एकूण ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
*शिवाजीनगर न्यायालयात हजेरी*
● प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रारंभी मोराडे, गायकवाड यांना, त्यानंतर मुंढे, जगताप, भुतेकर व मिसाळ यांना अटक करण्यात आली होती.
● सोमवारी रात्री मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे याच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
*पुणे पोलिसांच्या पथकाची धडक कारवाई* @CompetitivePharma

● लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (५०, रा. योगेश्वरीनगरी, अंबाजोगाई, बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबाजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (३६, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), श्याम महादू म्हस्के (३८, रा. पंचशीलनगर, अंबाजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (५१, रा. श्यामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
● तर यापूर्वी विजय मोराडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी मोराडे, गायकवाड आणि जगताप हे जालना जिल्ह्यातील आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

@CimpetitivePharma