🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

विषय - महिला बाल विकास अधिकारी या पदासाठी बी.फार्मसी पदवी ला | 💊🎯 Competitive Pharma 🎯 💊

विषय - महिला बाल विकास अधिकारी या पदासाठी बी.फार्मसी पदवी ला सेवा प्रवेश नियमात समाविष्ट
करणे बाबत.

वरील विषयास अनुसरून आम्ही फार्मसी विद्यार्थी हक्क समिती आपणांस विनंती करत आहे कि सध्या 'सेवा प्रवेश नियमात' B- Pharmacy या पदवी ला प्रवेश मिळावा. ही पदे आपल्या विभागामार्फत भरण्याच प्रमुख उद्देश महिला व बालकांना त्यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबीवर लक्ष केद्रींत करणे हा आहे. धोरण तयार करणे, कार्यक्रम/योजना तयार करणे, विकास योजनांची अंमलबजावणी करणे असे इतर अनेक बाबी या विभागात पार पाडत राहत. आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ICDS योजने अंर्तगत लाभार्थ्यांना पोषण आहार, लसीकरण, आरोग्य, शिक्षण अश्या सेवा पुरविल्या जातात. जर आपण फार्मसी च्या विद्यार्थ्यांना या पदासाठी सेवा प्रवेश नियमात बदल करून संधी दिल्यास महिला व बालकांना च्या आरोग्याशी संबंधित सुधारणा व अंमलबजावणी करण्यास अजून वाव मिळेल. कारण फार्मसी चे विद्यार्थी आरोग्य व औषधी च्या संबंधित सर्व शिक्षण घेतलेला विद्यार्थी असतो व तो चांगला प्रकारे महिला व बालकांच्या अपेक्षा समजावून घेउन छानस समुपदेशन करू शकतो, फार्मासिस्ट हे औषधे विषयी व आजारा विषयी आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांना व बालकांना/समाजात उत्तम प्रकारे जनजागृती करू शकतो.
फार्मसी पदवीमध्ये आम्ही विविध विषय शिकत असताना मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, अनाटोमी, सोशल फार्मसी, हे विषय सुध्दा शिकत असतो जे महिला व बालविकासा संबंधित खूप महत्वाचे आहेत. CDPO पोस्ट च्या अंतर्गत अंगणवाडी येते त्यांना सुद्धा औषध पुरवठा होत असतो BSC पेक्षा बी फार्मसी चे पदवीधर योग्य आहेत असे सूचित होते.
B-pharmacy हे वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी या शाखेमधे येत नसुन agriculture प्रमाणे तांत्रिक शाखेत येते. तर Bsc agriculture ची पदवी ग्राह्य आहे तर B-Pharmacy ला सुद्धा मान्यता मिळावी.
आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील फार्मसी चे विद्यार्थी या बाबतीत अनेक वर्षांपासून वंचित आहेत. आपण याबाबत सुयोग्य निर्णय घेउन सेवा प्रवेश नियमात फार्मसी या पदवीचा समावेश करून आम्हाला न्याय द्यावा अशी आम्ही सर्व फार्मसीचे विद्यार्थी आपणास विनंती करतो.


समनव्ययक नाव :

दिनांक : 16/12/2021
धन्यवाद.