Get Mystery Box with random crypto!

आज सोमवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ मा. उच्च न्यायालय, मुंबई येथ | Civil engineering government exam

आज सोमवार दिनांक २० सप्टेंबर २०२१ मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे सुनावणी झाली तर त्यामध्ये मुंबई, औरंगाबाद, नागपूर मधील सगळ्या याचिका ह्या एकत्रित करण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील सुनावणी ही ४/१०/२०२१ ला ठेवण्यात आले आहे
MES १९ मुलाखती बद्धल दुपारी सुनावणी झाली त्यामध्ये एमपीएससी काढून मा. न्यायालयाकडे विनंती करण्यात आली की मुलाखत कार्यक्रम हा २ ते २.५ महिने चालेल त्यामुळे मुलाखती घेण्यासाठी परवानगी मिळावी, मा. न्यायालयाच्या निकाला नुसार MES 19 चा निकाल लावला जाईल, तर त्यावर मा. न्यायालयाने ईडब्लूएस चे सीनियर कौन्सिल ह्यांच मत जाणून घेतले असता त्यांनी मा. न्यायालयाला सांगितले मुलाखती घेण्यास आमचा विरोध नाही पण त्या मुळे ईडब्लूएस वर अन्याय होता कामा नये.
मा. न्यायालयाने एमपीएससी ला मुलाखती घेण्यास परवानगी दिली असून लवकर च मुलाखत कार्यक्रम राबवला जाईल.
कोर्ट ऑर्डर आली की सविस्तर कळेल.
https://t.me/govmtcivilenginneringexam