Get Mystery Box with random crypto!

प्रति, .............................. ............ | Civil engineering government exam

प्रति,
..............................
..............................
..............................

विषय - जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता ( स्थापत्या / यांत्रिकी / विदुयत ) गट - ब ( अराजपत्रित ) पदाची भरती नवीन सेवा प्रवेश नियमनुसार घ्यावी व १२ + पदवीधर ( अभियांत्रिकी ) यांना संधी देणेबाबत.

संदर्भ:-
1)...कनिष्ठ अभियंता पदाचे सेवाप्रवेश नियम शासन अधिसूचना सार्वजनिक बांधकाम दि.१ जानेवारी १९९८
2)...जलसंपदा विभाग/ सेवाप्रवेश नियम -१११७/प्र.क्र.२५०/आ. (तांत्रिक )
3)....मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेला निकाल.दि - ७/४/२०२१
CIVIL APPEAL NO ( ५ ) - १३२३ - १३२४
4)...महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारण , मुंबई यांनी दिलेला निकाल.दि - २३/११/२०२१
MAT NO - ६६८ / २०१९
5)...सामान्य प्रशासन विभाग - सेवा प्रवेश नियमाचा आदर्श नमुना.दि - ९/९/२०२१
6)...जलसंधारण विभागाचा अद्यावत सेवा प्रवेश नियम - दि - २१/९/२०२१
7)...जलसंपदा विभागातील सेवाप्रवेश नियम सुधारित करण्यासाठी गठीत केलेली समिती -
दि - १/८/२०१९
महोदय ,
वरील विषयानुसार सद्यस्थितीत जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी / विद्युत) या पदाची भरती संदर्भ क्र. १ या सेवाप्रवेश नियमानुसार होते. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) गट ब अराजपत्रित ह्या पदासाठी पदविका आणि पदविका + पदवीधारकांना अर्ज करता येतो, पण १२ + पदवीधारक यांना ह्या पदासाठी अपात्र ठरविण्यात येते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून १२ + पदवीधारकावर अन्याय होत आहे.
जलसंपदा कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदासाठी मार्च -२०१९ मध्ये ५०० पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते.सदर जाहिरातीत जुनाट सेवा प्रवेश नुसार पदवी धारकांना डावलून अर्ज भरण्यात आले होते.
तसेच सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आदेशानुसार जलसंपदा विभागातील सेवा प्रवेश नियम सुधारीत करण्यासाठी २०१९ साली समिती नेमली गेली आहे.
तरी सदर भरती MPSC ने नवीन सेवा प्रवेश नियमनुसार राबवावी.

खालील मुद्द्यांच्या अनुषंगाने पदवी धारकांना संधी देणे उचित आहे.

१) ७/०४/२०२१ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने व महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकारण , मुंबई यांनी दिलेल्या निकालात अस सांगितले आहे की कनिष्ठ अभियंता या पदासाठी पदवीधरांना पात्र न करणे चुकीचे आहे.

२) ९ सप्टेंबर २०२१ सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार किमान शैक्षणिक अहर्ता असेल तर अधिक शैक्षणिक अहर्ता असणारा उमेदवार अपात्र ठरत नाही.

३) २१/०९/२०२१ रोजी जलसंधारण विभागाने जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित ह्या पदासाठी १२+ पदवीधर ना सुद्धा पात्र केले आहे तर आपण या निर्णयाचे अनुकरण का करत नाही?

वरील तीनही मुद्द्यांचा विचार करून MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या जलसंपदा कनिष्ठ अभियंता भरती नवीन सेवा प्रवेश नियमनुसार घेऊन १२ + पदवीधारकांना जलसंपदा - २०१९ जाहिरातीत संधी द्यावी.
धन्यवाद.

आपले स्नेहाकिंत

Engineers Association