Get Mystery Box with random crypto!

प्रति, मा.आयुक्त पुणे महानगरपालिका महाराष्ट् | Civil engineering government exam

प्रति,
मा.आयुक्त
पुणे महानगरपालिका
महाराष्ट्र राज्य

विषय : पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता पदभरतीतील अनुभवाची अट शिथील करण्यातबाबत....


महोदय,
वरील विषयास अनुसरून सांगू इछितो की , आम्ही विद्यार्थी भरपुर दिवसांपासून सरकारी नोकरभरतीची वाट बघत आहोत.एका खाजगी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीनुसार आम्हाला समजले की पुणे महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
तरी आपणास विनंती की सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अनुभवाची अट न ठेवता बेरोजगार मुलांना न्याय द्या.
मागील 3 वर्षांपासून कोणत्याही प्रकारची मोठी भरती झालेली नाही. भरती मध्ये सगळ्यांना समान संधी द्या. कोरोना काळात बेरोजगारीचे प्रमाण सुद्दा खूप वाढले आहेत.
तरी आपण आमच्या मागण्याचा विचार करावा ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी