Get Mystery Box with random crypto!

प्रति, मा.एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री तथा नगरविकास विभाग मं | Civil engineering government exam

प्रति,
मा.एकनाथ शिंदे साहेब,
मुख्यमंत्री तथा नगरविकास विभाग मंत्री,
महाराष्ट्र राज्य

महोदय,
                    वरील विषयास अनुसरून विनंती की ,  सहायक नगर रचनाकार श्रेणी -१ गट- ब (राजपत्रित) ह्या पदासाठी जानेवारी - २०२२ मध्ये MPSC तर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदासाठी महाराष्ट्रात एकूण 503 पदे मंजूर आहेत तर त्यातील उपलब्ध पुराव्यानुसार 16/09/2021 रोजी 275 पदे रिक्त आहेत, तर सध्यस्थितीत 503 पैकी रिक्त पदांचा आकडा हा 300+ आहे.
                        तत्कालीन कोरोणा संक्रमण काळातील भरती नियमानुसार रिक्त पदांपैकी केवळ 50% पदभरती करण्यास मुभा होती.परंतु नंतर प्रसिध्द झालेल्या वित्त विभागाच्या 12 एप्रिल 2022 च्या शासन निर्णयानुसार एमपीएससी च्या कक्षेतील पदांसाठी 100% पदे भरण्यास मान्यता मिळाली असून देखील नगरविकास विभागाने ATP च्या एकूण मंजूर 504 पदांपैकी  300+ पदे रिक्त असून देखील कुठल्याही वाढीव जागा एमपीएससी मार्फत भरण्यासाठी पत्रव्यवहार केला नाही.
                       सदर पदभरती ही ३ वर्षानंतर होत असतानासुध्दा अत्यंत महत्त्वाच्या अशा ATP पदासाठी नगरविकास विभागाकडून तत्कालीन कोरोणा संक्रमण काळातील भरती नियमानुसार केवळ 138 जागेचे मागणी पत्र MPSC ला प्राप्त झाले आहे. अधिवेनात मा.मंत्री श्री शंभुराजे देसाई यांनी वरील मुद्दा उपस्थित केला होता, सरकारदरबारी सदर बाब माहीत असून देखील त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.
                        तरी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री महोदयांनी तत्काळ ह्यावर कार्यवाही करून सध्यस्थितीत उपलब्ध १००% पदभरती बाबतचे वाढीव मागणी पत्र MPSC ला देण्यासंदर्भात निर्देश देवून उपकृत करावे ही नम्र विनंती.
                                              आपला विश्वासू
                                    एक बेरोजगार उमेदवार