Get Mystery Box with random crypto!

अर्थसंकल्प 2021: हायलाईट्स अर्थमंत्री निर्मला सीतारामन या | Mission MPSC

अर्थसंकल्प 2021: हायलाईट्स

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे :

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना फायदा झाला, घरी असलेल्या नागरिकांनाही जीवनावश्यक वस्तू मिळाल्या.

आपण परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि त्यानुसार नियोजन केलं. पंतप्रधान गरीब कल्याण योजना, 3 आत्मनिर्भर पॅकेज हे एक मिनी बजेट आहे.

कोरोनाविरुद्धचा लढा 2021 मध्येही सुरुच राहिल, कोरोनानंतरच्या काळात भारत देश हा एक आशेचा किरण बनला आहे.

भारताकडे आज दोन कोरोना लस उपलब्ध आहेत, स्वतःच्या नागरिकांसाठीच नव्हे, तर इतर देशांनाही त्याचा फायदा होईल.

या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतूद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

आरोग्य सुविधांसाठीची तरतूद गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 137 टक्क्यांनी वाढवली.

5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी आपली निर्मिती दुप्पट आकड्यांमध्ये वाढायला हवी, हे सर्व वाढवण्यासाठी निर्मिती केंद्रीत सबसिडी.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह टेक्स्टाईल पार्कची निर्मिती केली जाईल, पुढच्या 3 वर्षात हे काम होईल.

राष्ट्रीय पायाभूत सुविधा धोरण पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाढवण्याची गरज.

अर्बन क्लिन एअर मिशनसाठी 1.41 लाख कोटी रुपयांची तरतूद.