🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

सुप्रभात मित्रांनो आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करत अस | Mission MPSC

सुप्रभात मित्रांनो

आपण आपला अभ्यास चांगल्या पद्धतीने करत असालच त्यामध्ये सातत्यपूर्ण सुधारणा होत आहे याकडे आपलं लक्ष असेलच याबद्दल खात्री आहे. हे सर्व करत असताना तब्येत सांभाळून करा हा माझा अनुभवातून आलेला आणि एक फार्मासिस्ट म्हणून महत्त्वाचा सल्ला असेल तुम्हा सर्वांना.
आपल्या आहाराकडे विशेष लक्ष असु देत चला, जास्त मसालेदार पदार्थ, High fatty foods, junk food कटाक्षाने टाळावे कारण आपण बैठे काम करतो (दिवसभरात आठ ते दहा तास बसून राहतो) त्यामुळे पोटाचे/पचनसंस्थेचे विकार होण्याची शक्यता खूपच जास्त असते म्हणूनच आहार हा साधा आणि संतुलित असावा. त्यामध्ये dietary fibres जसे की हिरव्या पालेभाज्या, फळे, सलाद नक्की घ्यावे. (शक्य झाल्यास रोज दोन बदाम खाव्यात यातील Omega 3 fatty acids आपल्या खूप उपयोगाचे असतात आणि रोज दोन एवढं प्रमाण पुरेसं आहे.)
मला माहिती आहे आपण मेसवर जेवताना एवढी नाटकं चालत नाहीत शिवाय आपली आर्थिक परिस्थितीही बेताचीच असते पण तरीही काही अनावश्यक खर्च टाळून यासाठी थोडे प्रयत्न करायला हवेत. याशिवाय काही ना काही व्यायाम नक्की करावा ज्यामध्ये किमान दोन किमी चालले किंवा काही साधी योगासने आणि प्राणायाम आपण करू शकता. यासोबतच सलग तीन-चार तासांपेक्षा जास्त एका जागी बसून राहू नये याऐवजी दोन तासांनंतर दहा मिनिटं थोडा ब्रेक घेऊन बाहेर चालून यावं यामुळे आपल्या सतत वाचनामुळे आपल्या डोळ्यांवर पडणारा ताणही हलका होतो.
आपण किमान सहा ते आठ तास झोप नक्की घ्यायला हवी यापेक्षा कमी किंवा जास्तही नको. सहा-सात झोप नक्की घ्यायला हवी तीही सलग असावी आणि दुपारी झोपणे टाळावे.
बरेच जण पुरेसं पाणी पीत नाहीत तर याबाबत काळजी घ्यायला हवी पाण्याची बॉटल नेहमी सोबत ठेवावी आणि पुरेसं पाणी नक्की पीत रहावं. चहा-कॉफी यांचं प्रमाण अतिशय कमी ठेवावं मला स्वतःलाही तयारीच्या काळात चार-पाच वेळा चहा घ्यायची सवय होती परंतू त्यामुळे नंतर फार त्रास होतो तेव्हा दिवसात फक्त दोन वेळा चहा घ्यावा, हौस म्हणून, मित्र म्हणतायत म्हणून घेण्याचा चहा टाळल्यास आरोग्य तर चांगलं राहीलच शिवाय तुमचा मोलाचा वेळ वाचेल, तुम्ही नाही म्हणायला शिकू लागाल.
सर्वांनी काळजी घ्यावी आणि चांगला अभ्यास करावा ह्याच सदिच्छा

निरंजन कदम