Get Mystery Box with random crypto!

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे कालवश ज्येष्ठ साहित्यिक वसंत | MPSC Current Affairs

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे कालवश

ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. खार येथील राहत्य घरी फेणे यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी साहित्याच्या प्रवाहापासून अलग ठरेल असे, व्यक्तीपेक्षा समूहाला केंद्रस्थानी ठेवणारे लिखाण फेणे यांनी केले.

पुरस्कार आणि गौरव

‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या वर्षी ‘शब्द – द बुक गॅलरी’च्या वतीने वसंत फेणे यांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीसाठी ‘भाऊ पाथ्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार’ देण्यात आला.

वसंत फेणे यांची साहित्यसूची

• काना आणि मात्रा (कथासंग्रह)
• कारवारची माती (कादंबरी)
• काही प्यादी काही फर्जी (कथासंग्रह)
• ज्याचा त्याचा क्रूस (कथासंग्रह)
• देशांतर कथा (कथासंग्रह)
• ध्वजा (कथा, लेख, भाषणे)
• निर्वासित नाती (कथासंग्रह)
• पंचकथाई (कथासंग्रह)
• पहिला अध्याय (कथासंग्रह)
• पाणसावल्यांची वसाहत (कथासंग्रह)
• पिता-पुत्र (कथा)
• मावळतीचे मृद‌गंध (कथासंग्रह)
• मुळे आणि पाळे (कथासंग्रह)
• विश्वंभरे बोलविले (कादंबरी)
• शतकान्तिका (कथासंग्रह)
• सहस्रचंद्रदर्शन (कादंबरी)
• सेन्ट्रल बस स्टेशन (कादंबरी)
• हे झाड जगावेगळे (कथासंग्रह)