Get Mystery Box with random crypto!

------------------------------------------------------------ | MPSC Current Affairs

------------------------------------------------------------
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
प्रश्नसंच क्रमांक-15

-------------------------------------------------------------
प्र.1) भारतीय रेल्वेने आंध्रप्रदेशात "दक्षिण तट रेल्वे” (South Coast Railway -SCoR) या नावाने एक नवीन रेल्वे क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, या नव्या विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असेल?
1) विजयवाडा 2) तिरुपती
3) श्रीशैलम 4) विशाखापट्टणम


प्र.2) केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘राष्ट्रीय सॉफ्टवेयर उत्पादन धोरण-2019’ (National Policy on Software Products) याला नुकतीच मंजुरी दिली, या धोरणाचे खालीलपैकी कोणते लक्ष्य आहे?
1) 2025 सालापर्यंत जागतिक सॉफ्टवेयर उत्पादन बाजारात भारताचा वाटा दहापट वाढविणे.
2) 2025 सालापर्यंत 3.5 दशलक्ष लोकांसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देणार्‍या सॉफ्टवेयर उत्पादन उद्योगाच्या क्षेत्रात 10,000 तंत्रज्ञान स्टार्टअप कंपन्या चालवणे.
3) 2025 सालापर्यंत भारतीय सॉफ्टवेयर उत्पादन क्षेत्राची बाजारपेठ जवळपास 70-80 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी करणे.
4) 1, 2, 3 सर्व


प्र.3) अलीकडेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचा जैव-ऊर्जा विषयक तंत्रज्ञान सहयोग कार्यक्रम’ (International Energy Agency's Technology Collaboration Programme on Bioenergy / IEA बायोएनर्जी TCP) या कार्यक्रमाचा भारत कितवा सदस्य देश बनला?
1) 10 वा 2) 15 वा 3) 20 वा 4) 25 वा


प्र.4) खालील विधाने विचारात घ्या:
(a) 3 मार्च 2019 रोजी कौहर, अमेठी (उत्तरप्रदेश) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एके-47 रायफल’ निर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
(b) अमेरिकेकडून संरचित ‘कलाश्नीकोव्ह’ असाल्ट रायफलचे भारतात उत्पादन घेण्यासाठी अमेठीमध्ये ‘इंडो-अमेरिकन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ नावाचा संयुक्त उपक्रम तयार करण्यात आला आहे.
पर्यायी उत्तरे:
1) फक्त (a) योग्य 2) फक्त (b) योग्य
3) दोन्ही योग्य 4) दोन्ही अयोग्य


प्र.5) शालेय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन क्षेत्रात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) या वर्षापासून कोणत्या नावाने प्रशिक्षण कार्यक्रम 4 मार्च 2019 रोजी आरंभ केला?
1) जय विज्ञान, जय अनुसंधान 2) स्पेस स्टार
3) युवा वैज्ञानिक कार्यक्रम 4) रायझिंग स्टार


प्र.6) राष्ट्रीय सर्वसाधारण गतिशीलता कार्डचे (National Common Mobility Card -NCMC) संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
1) स्वदेशी विकसित केलेल्या या कार्डचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले.
2) हे कार्ड रूपे कार्डद्वारे समर्थित आहे.
3) हे कार्ड लोकांना विविध प्रकारचे वाहतूक शुल्क देण्यास सक्षमता प्रदान करते.
4) याला ‘एक राष्ट्र एक कार्ड’ हे नाव देण्यात आले आहे.


प्र.7) केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांनी आसामच्या धुबरी जिल्ह्यात ............... सीमेवर CIBMS (कॉम्प्रिहेन्सीव इंटीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टम) कार्यक्रमाच्या अंतर्गत BOLD–QIT (बॉर्डर इलेक्ट्रॉनिकली डॉमिनेटेड QRT इंटरसेप्शन टेक्निक) प्रकल्पाचे उद्घाटन केले?
1) भारत-चीन 2) भारत-भूतान
3) भारत-बांगलादेश 4) भारत-नेपाळ


प्र.8) भारतातले पहिले ज्वेलरी पार्क कोठे उभारले जाणार आहे?
1) बंगळूरू 2) नवी मुंबई
3) तामिळनाडू 4) तिरुपती


प्र.9) खालील विधाने विचारात घ्या:
(a) रॉजर फेडररने निक्तेच दुबई ड्युटी फ्री आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
(b) फेडररच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत ATP टूरवरील हे शंभरावे अजिंक्यपद आहे.
(c) ATP टूरवर 100 अजिंक्यपदे मिळविणारा तो जगातील पहिला आणि एकमेव टेनिसपटू ठरला आहे.
वरीलपैकी कोणती विधाने चुकीची नाहीत?
1) फक्त (a) आणि (b)
2) फक्त (a) आणि (c)
3) फक्त (b) आणि (c)
4) वरील सर्व


प्र.10) खालीलपैकी योग्य विधान/ने कोणते/ती?
(a) राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सर्व विद्यापीठांमध्ये लोकपाल नेमण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला.
(b) विद्यापीठस्तरावर लोकपाल नियुक्त करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
पर्यायी उत्तरे:
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b) दोन्ही
4) (a) आणि (b) दोन्ही नाही.