Get Mystery Box with random crypto!

ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात् | MPSC Mantra

ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहुर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला?
(राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023)

1) नारायण मेघाजी लोखंडे
2) भाऊ दाजी लाड
3) तुकाराम तात्या पडवळ
4) कृष्णाजी भालेकर

उत्तरः 4

स्पष्टीकरण

कृष्णराव भालेकर

कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली 'दीनबंधू' हे वर्तमानपत्र सुरू केले.

या दीनबंधूने सत्यशोधकांची वैचारिक बाजू समर्थपणे लोकांपुढे मांडली आणि ब्राह्मणी व्यवस्थेवर कठोर हल्ले चढविले.

याच पत्राच्या माध्यमातून फुले यांनी धार्मिक रूढी, परंपरा यांच्यावर टीकात्मक लेख लिहिले तसेच धर्मग्रंथांची चिकित्सा केली.

दीनबंधू दोन वर्षांनंतर बंद पडले. शेवटी सयाजीराव गायकवाडांनी बडोद्यातील त्यांच्या ग्रंथालयातील वासुदेव लिंगाजी बिर्जे यांच्या मदतीने 1907 मध्ये ते पुन्हा सुरू केले आणि तेव्हाच वेदोक्त प्रकरण घडले.

•त्यावेळी दीनबंधूने परखडपणे लिखाण करुन सत्यशोधकांची बाजू मांडली आणि वेदोक्त प्रकरणावर टीका केली.





Join
@SahyadriIAS