🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4 यामध्ये एकूण 4 कलम आहेत व | MPSC Polity

भाग 1: संघराज्य क्षेत्र कलम 1 ते 4

यामध्ये एकूण 4 कलम आहेत व या भागाचे नाव संघराज्य व त्याचे राज्य क्षेत्र असे आहे.


कलम 1
यानुसार संघाचे नाव भारत आणि India असे असेल. यामध्ये एकूण 28 राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. व या सर्वांना मिळुन संघराज्य क्षेत्र बनलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी देशामध्ये 11 ब्रिटिश प्रांत आणि 562 देशी संस्थनिके (राजेरजवाडे) एवढे मिळून देशाचे क्षेत्र होते. यापैकी 20 देशी – संस्थानिके हे पकिस्तानमध्ये गेले. 542 पैकी 539 संस्थानिके भारतात विलिन झाले. व तीन संस्थाने

(1)जूनागढ (2) हैद्राबाद (3) J & K

यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.


1946 च्या त्रिमंत्री योजनेनुसार देषामध्ये 11 प्रांत आणि 542 देशी संस्थानिका मिळून A, B, C, D या स्वरूपाचे राज्य बनवण्यात आले.

पूर्ण मराठवाडा हैद्राबादच्या निझामाच्या ताब्यात होता. तो भारत स्वात्रंत्र्यं झाल्यावर 1948 मध्ये भारतात विलिन झाला. 1965 मध्ये India & Pak War च्या वेळेस लालबहादुरशास्त्री PM होते.