🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

#दशकातील_नव्या_बदलाचे_वारे #Combine_Prelims_2020 नवे दशक हे | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

#दशकातील_नव्या_बदलाचे_वारे
#Combine_Prelims_2020

नवे दशक हे नवे बदल घेऊन येत असते. त्याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षेमध्ये देखील येताना दिसतो.राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये देखील तो संभाव्य बदल दिसला आणि त्याच बरोबर काही वेळापूर्वीच पार पडलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेत देखील आपल्याला हाच बदल पाहायला मिळाला.

विचारलेले प्रश्न हे वरवर पाहता जरी सोपे वाटत असले तरी खूप जास्त क्लिष्ट स्वरूपाचे होते.

तथ्यत्मक बाबींवर (Factual Details ) एकूणच भूगोल, विज्ञान ,चालू घडामोडी ,अर्थशास्त्र या विषयांमध्ये नेहमीपेक्षा अधिक भर दिसला.

तसेच भारतीय राज्यघटनेवरील प्रश्न हे विश्लेषणात्मक असल्यामुळे स्कोर करताना #हुकमी_एक्का असणाऱ्या विषयांनी मागे खेचले की काय अशी भावना देखील परीक्षार्थींची असेल.

इतिहास या विषयाचे प्रश्न हे सर्वसाधारणपणे जुन्याच पॅटर्ननुसार विचारले गेले.

बुद्धिमापन चाचणी आणि गणित या विषयात सोपे विचारले गेलेले प्रश्न ज्याने आधी सोडविले तो फायद्यात असेल.

2011 ची जनगणना आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप हे देखील पारंपरिक असले तरी त्यात पण बरेच कन्फ्युजन केलेले दिसते.

थोडक्यात काय तर नवीन दशकांमध्ये या सर्व नवीन बदलांची दखल घेऊन अभ्यासाची रणनीती ठरवणे आपल्या सर्वांना क्रमप्राप्त ठरते...!
#mpsc
#combinexam
Join @mpscupscclub