Get Mystery Box with random crypto!

काल answer key आली.. थोडेफार लोक खुश झालेत.. बाकी खूप सारी जनत | MPSC UPSC CLUB🔥🚨🎯

काल answer key आली.. थोडेफार लोक खुश झालेत.. बाकी खूप सारी जनता दुःखात डुबलेली आहे.. बऱ्याच लोकांचं हेच मनात चालुये.. माझंच नशीब साथ देत नाही.. माझाच silly mistakes होतात..दर वेळेस माझंच नशीब खराब आहे..
तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो.. अब्जावधी आकाशगंगा आहेत ह्या विश्वात.. त्या अब्जावधी आकाशगंगा मध्ये अब्जावधी सौरमाला आहेत.. त्यात अब्जावधी तारे आहेत.. त्यात आपला एक सूर्य.. त्या सूर्याभोवती करोडो लघुग्रह.. 8 मोठे ग्रह.. त्यात एक आपली पृथ्वी ज्या वर जीवसृष्टी आहे.. त्यात पण अब्जावधी जीव.. त्यात एक मनुष्य प्राणी.. ज्यात तुमचा जन्म झाला.. या पेक्षा चांगलं नशीब काय असणार ???
आपल्या आयुष्यात मिळालेले सर्वात मोठे गिफ्ट हे आपले आयुष्यच आहे.. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदात जगला पाहिजे.. वेळ प्रत्येक दुःखाला विसरवून टाकते.. काल ज्यांचा स्कोर कमी आला ते खूप दुःखी आहेत.. 8 दिवसात ते पण नीट होऊन जातील.. पण जर 8 दिवसात सर्व नीट होणारच आहे.. मग 8 दिवस नाराजी मध्ये जगून काय फायदा ? ते 8 दिवस नन्तर कधीच भेटणार नाही परत.. त्यापेक्षा नाराजीत जगण्यापेक्षा उद्याचा चांगला भविष्याचा उम्मीदी मध्ये जगलेले चांगलं..
शेवटी..
उम्मीद पे दुनिया कायम है....
2015 मध्ये south africa तुफान फॉर्म मध्ये असताना 1 बॉल राखून सेमी फायनल मध्ये हरून गेले होत.. ते पण त्यावेळेसचा जगातला सर्वात बेस्ट फिल्डर A B डीविलीयर्सने हातातला रन आऊट सोडून दिल्यामुळे.. प्रेशर अशी गोष्ट आहे.. जी ग्रेट मधल्या ग्रेट माणसाला चूका करायला भाग पाडते.. तुम्ही किती पण ग्रेट राहा, टॅलेंटेड राहा, मेहनती राहा, किती पण प्रॅक्टिस करा.. कोणत्या पण स्पर्धेत 1% लक असतच.. त्यामुळे पूर्ण प्रामाणिक मेहनत घ्यायची आणि स्पर्धेला सामोरे जायचं.. आणि नन्तर एकदा स्पर्धा सम्पली की.. त्या अनुभवाला एन्जॉय करायचं.. कोण जिंकलं , कोण हरलं याचा हिशोब करत बसायचा नाही..एक सेमी फायनल हरल्याने डीविलीयर्सच अस्तित्व सम्पलं नाही.. तो आज पण सर्वोत्कृष्ट खेळाडूमध्ये गणलाच जातो...
पण याचा अर्थ आपण फेल झालो याच सर्व खापर नशिबावर फोडुन मोकळं नाही व्हायचं.. जे पास झाले त्यांनी आपल्यापेक्षा जास्त मेहनत घेतली होती.. आपल्या अपयशाच नीट मूल्यमापन करा..आपल्या चूका नीट बघा.. त्या सुधरवा.. पुढचा वेळेस जास्त मेहनत घेऊन परत या.. आणि रिजल्ट बदलवा.
Join @mpscupscclub