Get Mystery Box with random crypto!

#prediction सामाजिक परिषद:- 1887 ला राष्ट्रीय सभेचे मद्रासला अ | Pratik Bhad

#prediction
सामाजिक परिषद:-
1887 ला राष्ट्रीय सभेचे मद्रासला अधिवेशन पार पडले(अध्यक्ष- बदरुद्दीन तय्यबजी). न्या. रानडेंनी राष्ट्रीय सभेत राजकीय विषयांबरोबर सामाजिक विषयावर चर्चा व्हावी असा आशय व्यक्त केला होता. परंतु त्यास यश न आल्याने त्यांनी सामाजिक परिषद भरविण्याची संकल्पना समोर आणली. त्यानुसार मद्रासलाच परिषद सर्वप्रथम भरविण्यात आली, स्थापनेत बेहरामजी मलबारी रानडेंच्या सोबत होते.
पहिले अध्यक्ष : सर. टी. माधवराव
उपाध्यक्ष : महादेव गोविंद रानडे
सचिव : बहाद्दूर रघुनाथराव
1895 पुणे आदिवेशनापर्येंत सामाजिक परिषद राष्ट्रीय काँग्रेस च्या मंडपात भरत होती.
न्यायमूर्ती रानडेंनी सामाजिक परिषदेंतर्गत बालविवाह प्रथा रोखण्यासाठी 'प्रतिज्ञा चळवळ' सुरू केली होती.

- उमेश कुदळे
https://t.me/umeshkudale