Get Mystery Box with random crypto!

UG, PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी अनिवार्य UGC Gui | Shivaji University Updates

UG, PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सीईटी अनिवार्य



UGC Guidelines 2022-23: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशभरातील केंद्रीय अनुदान प्राप्त विद्यापीठांमध्ये रिसर्च ,पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी मोठे बदल केले आहेत. आयोगाने पीएचडी (PHd) प्रवेशांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. याशिवाय या केंद्रीय सहाय्यता प्राप्त उच्च शिक्षण संस्थांमधील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच CET देऊन पात्र होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यूजी, पीजी आणि पीएचडी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसंबंधीचे हे नवे नियम पुढील शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून लागू होणार आहेत.