🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _____________ द | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________
देशात १ जुलै २०२२ पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी!
13 AUGUST 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• पर्यावरण मंत्रालयाने पुन्हा एकदा एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
• १ जुलै २०२२ पासून एकल वापरातील प्लास्टिक वस्तूंची निर्मिती, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम २०२१ अधिसूचित केला आहे.
• १ जुलै २०२२ पासून पॉलिस्टीरिन आणि विस्तारीत पॉलिस्टीरिनसह एकेरी वापरातील प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असेल.
• ध्वज, फुगा, आइसक्रिम आणि कँडीसाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकॉल याचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.
• प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ५० मायक्रॉनवरून ७५ मायक्रॉन करण्यात येणार आहे.
• ३१ डिसेंबर २०२२ पासून ही जाडी १२० मायक्रॉन केली जाणार आहे.
• सध्या देशात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडींच्या पिशव्यांवर बंदी आहे.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini