Get Mystery Box with random crypto!

परीक्षेला जाता जाता... _गट 'क' पूर्व परीक्षेला सामोरे जाण्याआ | स्पर्धावाहिनी

परीक्षेला जाता जाता...
_गट 'क' पूर्व परीक्षेला सामोरे जाण्याआधी लक्षात घ्यावयाचे काही महत्त्वाचे मुद्दे_
-----------------------
1) विषयाचे नियोजन :

पेपर 1 तासाचा असल्या कारणाने पेपर वेळेत सोडवण्याचा प्रयत्न असावा..म्हणजे सोपे वाटणारे प्रश्न सुरुवातीला घेऊन लवकरात लवकर सोडवून अवघड जाणारे प्रश्न नंतर सोडवणे...त्यासाठी थोडा जास्त वेळ राखून ठेवण्याचा प्रयत्न करणे..(गणित व बुद्धिमत्ता सोडवायला वेळ लागणाऱ्या परिक्षार्थीनी तो आधी न घेता शेवटी सोडवायला हरकत नाही.. सोपा वाटणाऱ्या विषयातील वेळ गणितासाठी वापरावा.)

2) वेळेचं नियोजन:

पूर्व परीक्षेचा पेपर 60 मिनिटांचा असल्याने एक प्रश्नासाठी  (3600/100= 36सेकंद)  किमान अर्ध्या मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे प्रश्न वाचून उत्तर काढून उत्तर पत्रिकेत गोल करणे यासाठी 37 सेकंद वेळ आहे.
बहुतेक विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयासाठी जास्त वेळ लागतो.अश्या विद्यार्थ्यांना (अवघड वाटणाऱ्या विषयाच्या) वेळेचे नियोजन करणे व हे विषय शक्यतो शेवटी सोडवणे आवश्यक ठरते.

3) सोपा विषय आधी:

हक्काचे मार्क्स आपल्या खात्यात जमा करणे हा प्रथम हेतू असावा, कारण एक वेळ अवघड प्रश्न चुकला तरी चालेल पण सोपा प्रश्न चुकायला नको... सोपा विषय आधी घेतल्याने अवघड वाटणाऱ्या प्रश्नांनाही नंतर वेळ देता येतो..(सोपा विषय आधी घेतल्याने कॉन्फिडन्स लेव्हल वाढते व त्याचा सकारात्मक परिणाम पेपर वर होतो.. आणि समजा सोपा विषय जर अवघड वाटत असेल तर असे समजावे की तो महाराष्ट्र तील सर्वच मुलांना अवघड जाईल त्यामुळे घाबरून न जाता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करणे.

4) पेपर सोडवताना ब्लँक होणे:

बहुतेक विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो.सराव परिक्षेवेळी चांगले मार्क मिळतात, वेळेवर पेपर सोडवून होतो परंतु ऐन परीक्षांच्या वेळी काहीच आठवत नाही.अश्यावेळी थोडे थांबावे..मन शांत करून काही सेकंद थांबून प्रश्नपत्रिकेतील सोपे प्रश्न शोधून सोडवणे..नंतर बाकीचे प्रश्न सोडवणे. (हा प्रॉब्लेम त्या मुलांना होतो ज्यांनी आधी अवघड जाणारे प्रश्न आधी सोडवायला घेतले आहेत आणि ज्यांनी परीक्षेचा अतिरिक्त ताण घेतला आहे) त्यासाठी सोपे जाणारे विषय आधी घ्यावे.

5) पेपर आयोगाच्या क्रमाने न सोडवणे..
आपल्या प्राधान्य क्रमाने सोडवणे..

याचा एक फायदा आहे..ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान सोपे जाते त्यांनी आधी विज्ञान चे प्रश्न सोडवावे, ज्यांना भूगोल सोपा जातो त्यांनी भूगोल आधी घ्यावा, ज्यांना राज्यघटना सोपी वाटते त्यांनी आधी राज्यघटना घ्यावी...या प्रमाणे आपला स्वतः चा असा प्राधान्यक्रम ठरवून घ्यावा..जेणेकरून वेळेचे नियोजन अचूक करता येईल व अवघड वाटणाऱ्या प्रश्नासाठी शेवटी जास्त वेळ मिळेल.
आयोगाचे 4 सेट ramdom पद्धतीने सेट केलेले असतात...त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार प्रश्न निवडले तर वेळ वाचतो.

6) Relative Competition

या ठिकाणी एक महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे... या परीक्षा म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा नाहीत... यामध्ये पत्रतेचा कट ऑफ फिक्स नाही (जसा शालेय किंवा विद्यापीठाच्या परीक्षाना असतो 35/100)... म्हणजेच कट ऑफ पेपर च्या कठीण्य पातळी आणि जागांची संख्या यानुसार बदलत असतो... त्यामुळे पेपर अवघड आला तर गरबडून जाऊ नये कारण तो सर्वांनाच अवघड जाणार आहे आणि मेरिट खाली येणार आहे... दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा प्रश्न चुकायला नको जो इतर सर्वांचा बरोबर येणार आहे... कारण हे Relative Competition आहे.

7) परीक्षेच्या ठिकाणी पोहचण्याचे नियोजन:

सध्याचे आयोगाचे नियम बघता विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहचणे गरजेचे आहे (काही केंद्रावर वेळेत न पोहचल्यामुळे मुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे).... करिता सर्वांनी वेळेवर केंद्रावर पोहचण्यासाठी नियोजन करावे.

आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
-------------
टीम स्पर्धावाहिनी