Get Mystery Box with random crypto!

भारतातील रामसर स्थळांमधे आणखी 11 स्थळांचा समावेश. भारतातील र | स्पर्धावाहिनी

भारतातील रामसर स्थळांमधे आणखी 11 स्थळांचा समावेश.

भारतातील रामसर स्थळांमधे आणखी 11 स्थळांचा समावेश होऊन आता भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 75 झाली आहे या स्थळामधे सामावलेले एकूण क्षेत्रफळ आता 13 लाख 26 हजार 677 हेक्टर इतके झाले आहे.

महत्वाचे मुद्दे:

• तमिळनाडु मधील चार, ओडिशा मधील तीन, जम्मू-कश्मीर आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधील एक-एक साइट यामधे समाविष्ट केलेली आहे.

• वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 28 रामसर स्थळांची यादी समाविष्ट केली गेली आहे.

• तमिळनाडु मध्ये रामसर स्थळांची सर्वाधिक १४ संख्या आहे तर उत्तर प्रदेशात १० रामसर स्थळ आहेत.

रामसर कन्वेंशन (Ramsar Convention on Wetlands of International Importance) :

• इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला. 
• हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.
• भारताने हा करार ०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वीकारला.
• १९७१ मध्ये रामसर (ईरान) मध्ये समाविष्ट केले गेले. 
• युनायटेड किंगडम मधे सर्वाधिक १७५ रामसर साइट्स आहेत.  त्यानंतर मेक्सिको मधे १४२ रामसर साइट्स आहेत.
• जागतिक पाणथळ जागा दिन दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील रामसर स्थळे:

• पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील ‘नांदूर मधमेश्वर’अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे.
• नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले  बुलढाण्यातील ‘लोणार’ सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे.
• यानंतर आता ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ झाले आहे.

महाराष्ट्रातील एकूण 3 रामसर स्थळे :
१) नांदूर मंधमेश्वर.
२) लोणार सरोवर.
३) ठाणे खाडी.



संकलन : टीम स्पर्धावाहिनी
---------------------
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...

http://shorturl.at/kJPV7