Get Mystery Box with random crypto!

#GOOD_TO_KNOW *शेअर मार्केट चार्ट रिडींग कसे करावे ?* अनेक व | TEJGyan

#GOOD_TO_KNOW

*शेअर मार्केट चार्ट रिडींग कसे करावे ?*

अनेक वेळा विचारले जाते कि मला शेअर मार्केट मध्ये काम करायचे आहे, मला शिकायचे आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक अशी फाईल बनवली आहे कि ज्याचा उपयोग करून ट्रेंड लाईन बनवणे आणि त्यावर सराव करणे शक्य होईल. तत्पूर्वी ट्रेंड लाईन म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ.
शेअर मार्केट मध्ये स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यासाठी टेनिकल अनालिसिस चा वापर करून चार्ट रिडींग जमायला हवे. चार्ट रिडींगचे अनेक फ्री वेबसाईट आहेत, त्यावर ट्रेंड लाईन बनवून एखादा स्टॉक वर जाईल, पडेल कि तिथेच रेंगाळत राहील याचा अंदाज आखता येतो.

ट्रेंड लाईन बनवल्यानंतर त्या लाईन्स वरच्या दिशेने जात असतील तर स्टॉक अपट्रेन्ड/तेजी किंवा वाढण्याची शक्यता जास्त असते आणि अशा वेळेस ट्रेंड लाईन्स नवीन नवीन हाय (HIGH ) बनवता दिसतो त्याला हायर हाय असे संबोधले जाते.

ट्रेंड लाईन बनवल्यानंतर त्या लाईन्स खालच्या  दिशेने जात असतील तर स्टॉक डाऊनट्रेन्ड/मंदी  किंवा पडण्याची शक्यता जास्त असते आणि अशा वेळेस ट्रेंड लाईन्स नवीन नवीन लो  (LOW) बनवता दिसतो त्याला लोवर लो असे संबोधले जाते.   

याचा सविस्तर अभ्यास आणि सराव करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरील विडिओ पाहावा आणि गूगल शीट ची लिंक दिली आहे, ती उघडून त्याप्रमाणे सराव नक्की करा. 

युट्युब विडिओ लिंक : 




गूगल शीट लिंक  :
https://docs.google.com/spreadsheets/d/1JMsQIDA9N6KBWwS47cowNYERdkwmZ03Ud0NDBG56PHk/edit?usp=sharing

*आपल्या ओळखीच्या लोकांना जरूर पाठवा.* माझे  youtube चॅनेल subscribe करा आणि विडिओ पाहून आपली प्रगती करा. धन्यवाद . 

नितीन पोताडे