Get Mystery Box with random crypto!

६) कोणतेही करिअर अथवा व्यवसाय निवडण्याआधी त्यासाठी आवश्यक असले | 🏹आदित्य अकॅडमी🏹

६) कोणतेही करिअर अथवा व्यवसाय निवडण्याआधी त्यासाठी आवश्यक असलेल्या बेसिक गोष्टी आधी शिकून आत्मसात करणे.
७) कोणी जर आपल्या काळापेक्षा पुढे असणारे करिअर निवडत असेल तर त्याला योग्य ते मार्गदर्शन करणे तसेच यातील धोके व फायदे नीट समजून सांगणे.
८) मुलांच्या अवास्तव मागणीला बळी न पडता त्यांना जे करायचे आहे ते त्यांनी स्वत: कमावलेल्या पैशातून करण्यासाठी प्रोस्ताहन देणे व स्वयंशिस्त लावणे.
९) आपल्याला जे काही करायचे आहे त्यासाठी साधनसामुग्री किंवा कॅपिटल (Tools of Trade) जमा करणे.
१०) कुटुंबाचे महत्व ओळखता येणे गरजेचे आहे तसेच शक्य होत असल्यास त्यांना आपल्या कामात समाविष्ट करणे. आपल्या कुटुंबाशिवाय आपल्याला मोठे होता येणार नाही.
११) कोणतेही काम/व्यवसाय अल्पावधीत नफा देईलच असे नाही यासाठी आपली थांबण्याची तयारी असायला हवी.
१२) सतत अभ्यासाची वृती जागृत ठेवणे गरजेचे आहे.
१३) बदलत्या काळाची पावले अचूक ओळखता येणे गरजेचे आहे.
१४) स्वत:च्या कामाची आवड असायला हवी ती कायम कशी जोपासता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत.
१५) कितीही उंच उडाले तर शेवटी जमीनीवरच यायचे आहे हे नेहमी पक्के डोक्यात असायला हवे.

दीपक गायकवाड
- आदित्य अकॅडमी
- बोधिवृक्ष फाऊंडेशन
संपर्क:- 9763600585