Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे अभियांत्रिकी सेवा परीक्षेत प्रती | Civil engineering government exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे अभियांत्रिकी सेवा परीक्षेत प्रतीक्षा यादी ठेवण्यासंदर्भात विचार मंथन सुरू असल्याची प्राथमिक बातमी आलेली आहे.
सदर परीक्षेत विविध विभागातील विविध संवर्ग मधील पदे असतात. त्यामुळे प्रतीक्षा यादी कशी लावणार या संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहे.

आमच्या मते आयोग एक काम करू शकते..
अंतिम निकाल जाहीर करण्यापूर्वी एक प्रोव्हिजनल निकाल जाहीर करण्यात यावा.

सदर निकाल जाहीर केल्यानंतर ज्या उमेदवाराची निवड झालेली आहे त्याना सदर पदावर तुम्ही नियुक्ती घेणार आहे की नाही या बाबत ची माहिती लोकसेवा आयोगाकडे एक महिन्याच्या आत शपथपत्र द्वारे कळविण्यास वेळ द्यावा.
ज्यांनी नियुक्ती घेण्यास इच्छुक नाही असे कळविले अश्या उमेदवार यांचे नावे वगळुन इतर पात्र उमेदवार यांची निवड करून अंतिम निकाल जाहीर करण्यात यावा.
यामुळे कमी वेळात प्रतीक्षा यादी चा प्रश्न सुटून जाईल.
@civinfo