🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये MPSC क | Civil engineering government exam

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो

येत्या काही दिवसांमध्ये MPSC कडून MES 2019 सिव्हिल साठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.3 वर्षांचा प्रदिर्ग संयम फळास येईल.दशकातील संख्येने सर्वात मोठी पदांची जाहिरात व अंतिम निकलापर्यंत सर्वात जास्त वेळ घेणारी ही जाहिरात असल्या कारणाने खूप विद्यार्थ्यांचे आयुष्याला कलाटणी नक्कीच मिळणार हे निश्चित आहे.
मुख्य परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची ही जबाबदारी आहे की त्याने एकही पद रिक्त राहून वाया जाऊ देऊ नये.
MPSC ने दोन वेळा पोस्ट प्रेफरन्स भरण्याची संधी देऊनही काही विद्यार्थ्यांनी नको असलेली किंवा आधीच जॉब वर असलेली पोस्ट भरली आहे. अश्या प्रकारची कृत्य करून उमेदवार ह्या मधून काय मिळवणार आहे? १-२ दिवसाचा आनंद?
परंतु १-२ दिवसाच्या आनंदापेक्षा १-२ जणांचं आयुष्य बदलू शकल असत हा विचार स्वतःच्या स्वार्था आधी सर्वांनी करणे गरजेचे आहे.
2 वेळा प्रेफरन्स ची संधी देऊन सुद्धा ज्यांनी चुका केल्यात आश्याना तिसरी व अंतिम संधी opting out माध्यमातून मिळणार आहे व ही संधी नक्कीच कोणीही गमावू नये ही विनंती आहे .ह्यावर जरूर विचार करा.
उदा.समजा जर आपल्या हातून पोस्ट ब्लॉक झाली तर ती कोणाच्या फायद्याची तर राहणारच नाही शिवाय ती रिक्तच राहून परत त्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार समोर आंदोलने करावे लागतील,मग कोर्ट केस, मग कसही जागा विभागाने भरायच ठरवलं तर वित्त विभागाची परवानगी लागेल.. मग परत mpsc ची 2 वर्षाची किचकट प्रोसेस व सोबत मानसिक तणाव व अभ्यास...म्हणून सर्वांना विनंती आहे की कृपया करून एकही पोस्ट ब्लॉक होईल अस वागू नका.
जे JE पदावर कार्यरत आहेत किंवा JE समतुल्य पदावर कार्यरत आहेत व त्यांची service ३-४ वर्ष झाली आहे त्यांनी सुद्धा गट अ साठीच प्रयत्न करायला हवे अस सोयीस्कर (wrd असाल तर pwd टाकू शकता) वाटते.
एकच उद्देश आहे की पोस्ट वाया जाऊ नये व कोणाचे तरी भले व्हावे.नक्की विचार करा

@Rzgr_Tak