🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला बंदी नेपाळने गिर्यारोहकांच्य | MPSC Current Affairs

एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला बंदी

नेपाळने गिर्यारोहकांच्या सुरक्षेचा विचार करून नेपाळच्या अखत्यारीत असलेल्या शिखरांवर आणि माऊंट एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला जाण्यास मनाई केली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये ग‌र्यिारोहकांचे झालेले मृत्यू पाहता नेपाळमधून एकट्या ग‌र्यिारोहकाला एव्हरेस्टवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

त्याचबरोबरच अंध आणि दिव्यांग गिर्यारोहकान्ना एव्हरेस्ट चढाईला मनाई केली आहे.

सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक हे देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना टाळण्यासाठीच सुरक्षेचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.