🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

“ड्रायपेटेस कलामी” - पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या वनस्पतीला माज | MPSC Current Affairs

“ड्रायपेटेस कलामी” - पश्चिम बंगालमध्ये आढळलेल्या वनस्पतीला माजी राष्ट्रपती कलाम यांचे नाव देण्यात आले

बॉटनीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या डॉ. गोपाळ कृष्ण यांच्या नेतृत्वात संशोधकांनी पश्चिम बंगालमधील दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये वनस्पतीची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. त्यांनी या नव्या वनस्पतीला ‘ड्रायपेटेस कलामी (Drypetes Kalamii)’ असे नाव दिले आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. ही एक फूल वनस्पती आहे आणि ‘ड्रायपेटेस एलिसी’ या गटाशी संबंध असणार्‍या वनस्पतीचे छोटे रूप आहे.

पश्चिम बंगालमध्ये बक्सा राष्ट्रीय उद्यान (बक्सा व्याघ्र प्रकल्पाचा प्रमुख क्षेत्र) येथे 2011 साली केल्या गेलेल्या वनस्पतींच्या सर्वेक्षणात ही वनस्पती आढळून आली. मात्र त्यावेळी याला ओळखल्या जाऊ शकले नाही. पुढे आणखी एकाने राज्यातल्या जलडापारा राष्ट्रीय उद्यानातून स्त्रिलिंग गटातली ही वनस्पती फळासकट गोळा केली. फळामुळे याला ओळखण्यास सहजता आली. त्यानंतर घेतलेल्या शोधत असे आढळून आले की, दोन्ही वनस्पती ड्रायपेटेस कुटुंबाशी संबंध ठेवतात. 

ड्रायपेटेस कलामीची वैशिष्ट्ये

वनस्पतीची वाढ साधारणतः 1 मीटरपर्यंत आहे. ही एकलिंगी प्रजाती आहे, म्हणजेच त्यामध्ये स्त्रिलिंग व पुल्लिंग हे प्रकार आहेत.

ही वनस्पती समुद्रसपाटीपासून 50-100 मीटर उंचीवर, उपोत्पादनयुक्त आर्द्र अर्ध-सदाहरित जंगलातील ओल्या, सावली असलेल्या भागात आढळते.

वनस्पती झुडुप स्वरुपात आढळून येते आणि त्याला फिकट पिवळ्या रंगाची फुले आणि नारिंगी-लाल फळे लागतात.

ही वनस्पती संस्कृतमध्ये उल्लेखलेल्या ‘पुत्रजिवाह’ नामक औषधी वनस्पतीशी संबंध ठेवते.

आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) च्या नियमांनुसार, या वनस्पतीला "अत्याधिक धोक्यात असलेल्या" वनस्पतींच्या श्रेणीत तात्पुरते नोंदवलेले आहे.

जगभरात ड्रायपेटेस कुटुंबातल्या 220 प्रजाती आढळतात आणि त्यापैकी 20 भारतात आढळून येत असल्याची नोंद आहे.