Get Mystery Box with random crypto!

देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची अंतिम चाचणी सप्तश्रृंगी | MPSC Current Affairs

देशातील पहिल्या फ्युनिक्युलर ट्रॉलीची अंतिम चाचणी

सप्तश्रृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीची 28 फेब्रुवारी रोजी राज्य आपत्ती व्यवस्थापन पथक व यशदाच्या पथकाने अंतिम चाचणी घेऊन प्रकल्पाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाय योजनांची पाहाणी केली आहे.
 
सप्तश्रृंगी गडावरील खाजगीकरणाच्या माध्यमातून साकारण्यात आलेला युक्रेननंतरचा भारतातील पहिला फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण होत असून प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे आवश्यक प्रशासकीय सोपस्कार पार पाडण्याच्या दृष्टीने मुंबई येथून आलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या खास पथकाने तसेच यशदाच्या पथकाने फ्यॅनिक्युलर ट्रॉलीची पाहाणी करुन चाचणी घेतली.
 
तसेच या प्रकल्पातंर्गत बांधण्यात आलेले प्रवासी प्रतीक्षालय, नोंदणी कक्ष, कर्मचारी कक्ष, फलाट, निवास व्यवस्था, भाविकांच्या निवासासाठी 24 सर्वसाधारण व 6 व्हीआयपी सुट, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधा, उपहारगृह, अंतर्गत रस्ते, सुशोभिकरण आदी कामांची पाहणी केली. सुरक्षितेच्या दृष्टीने केलेल्या उपाय योजना, अग्निप्रतिबंधक उपाय योजनांची पाहणी केली.
 
दरम्यान खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस अधिक्षक संजय दराडे, निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनीही फ्युनिक्युलर ट्रॉलीची पाहाणी करुन ट्रॉलीने श्री भगवती मंदिरात जाण्या येण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या व्यवस्थेची माहिती करुन घेतली.