Get Mystery Box with random crypto!

जगातील पहिले आण्विक ऊर्जेवरील विमान आण्विक ऊर्जेवर चालणारे हे | MPSC Current Affairs

जगातील पहिले आण्विक ऊर्जेवरील विमान

आण्विक ऊर्जेवर चालणारे हे जगातील पहिले मॅग्नावेम विमान आहे. या विमानाचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी याची कन्सेप्ट डिझाइन तयार केली आहे. या विमानाची किमान गती सुमारे 1850 किमी प्रतितास राहील. म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क पोहोचण्यासाठी केवळ तीन तास लागतील.
 
विशेष म्हणजे या विमानातून कार्बन उत्सर्जित होणार नसल्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही. विमानात लावण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट फ्यूजनरिअॅक्टरमधून त्याला ऊर्जा मिळेल. लॅटिन भाषेतील ‘मॅग्ना एवम’ या शब्दातून या विमानाला नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ मोठा पक्षी असा होतो.
 
विमानात "प्लाझ्मा अॅक्युटेटर्स" आहेत, जे विमानाला तसेच पंखांवरील हवेला नियंत्रित करतील. त्यामुळे आकाशात हे विमान चांगले प्रदर्शन करू शकणार आहे.

जॉईन करा @MPSCCurrent