Get Mystery Box with random crypto!

आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताला कांस्यपदक इंडोनेशियाक | Mpsc Pune Pattern

आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताला कांस्यपदक

इंडोनेशियाकडून पराभूत; लक्ष्यचा आशियाई विजेत्या जोनाटनवर धक्कादायक विजय
लक्ष्य सेनने आशियाई विजेत्या जोनाटन ख्रिस्तीवर धक्कादायक मात केल्यानंतरही भारताला आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत इंडोनेशियाकडून २-३ पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारताला स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचे या स्पर्धेतील हे २०१६नंतरचे दुसरे कांस्यपदक ठरले.

जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानी असलेल्या लक्ष्यने सातव्या क्रमवारीवरील जोनाटनला २१-१८, २२-२० असे नमवत दमदार विजय नोंदवून दिला. त्याआधीच्या एकेरीत अ‍ॅँथनी गिंटिंगकडून ६-२१ पिछाडीवर असलेल्या बी. साईप्रणितने सामना अर्धवट सोडला.

एकेरीत शुभांकर डे याने २०व्या क्रमवारीवरील शेसार रुस्ताविटोला २१-१७, २१-१५ नमवले. मात्र चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन या जोडीचा दुहेरीत पराभव झाला.

--------ध्येय तुमचे दिशा आमची-----

जॉईन करा :-
https://t.me/joinchat/AAAAAEoAEg9xnln4nNpbbA