Get Mystery Box with random crypto!

क लोकशाही घटनात्मक मार्ग सोडून घटनाबाह्य मार्ग स्वीकारण्याची श | Mpsc tiger's 🐯

क लोकशाही घटनात्मक मार्ग सोडून घटनाबाह्य मार्ग स्वीकारण्याची शक्यता वाढते. हिंसाचारही निर्माण होवू शकतो. अशा परिस्थितीत काही वेळा त्याचे पर्यवसान दहशतवादात होवू शकते.

Member 1- चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद अशा दहशतवादाच्या दोन संकल्पना पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानच्या या संकल्पना काय आहेत हे आधी सांगा आणि दहशतवाद चांगला आणि वाईट अशी विभागणी होवू शकते का याबद्दल तुमचं मत सांगा.

मी- सर जेव्हा पाकिस्तानात दहशतवादी कारवाया होतात तेव्हा पाकिस्तानला तो वाईट दहशवाद वाटतो. परंतु इतर देशात उदा. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया झाल्या तर तो तिथल्या आझादिसाठीचा संघर्ष असून तो चांगला दहशतवाद आहे असं पाकिस्तानला वाटतं. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत वाईटच असतो. त्याची चांगला आणि वाईट अशी विभागणी होवू शकत नाही.

Member 2- सध्या पुतीन आणि ट्रम्प चर्चेत आहेत. मी काल एका वर्तमानपत्रात वाचले कि येत्या काळात ट्रम्प यांना मागे टाकून पुतीन जगाचं नेतृत्व करतील. ट्रम्प यांच्यापेक्षा पुतीन हे वरचढ होतील असं बोललं जातं. तुम्हाला हे पटतं का?

मी- सर रशियाचे अध्यक्ष पुतीन हे खूप खंबीर व्यक्तिमत्व आहे. प्रशासनावर आणि एकंदरच जागतिक राजकारणावर त्यांची बर्यापैकी हुकुमत आहे. युक्रेन आणि सिरीया प्रश्नानंतर ज्या पद्धातीने पुतीन यांनी जागतिक दबावाला तोंड दिले ते पाहता त्यांचा नेतृत्व गुण आणि स्वाभिमानी बाणा दिसून आला. त्यामुळे पुतीन हे ट्रम्प यांच्यापेक्षा वरचढ होतील असं मला वाटतं.

Member 2- प्रशासनात Terror on work ही एक संकल्पना आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

मी- Sorry sir. मी याबद्दल कधी ऐकले नाही.

Member 2- प्रशासनात काम करताना सतत कुणाचतरी दडपण किंवा दहशत असावी अशी एक संकल्पना आहे. असावं का असं दडपण ?

मी- सर प्रशासनात काम करताना सकारात्मक दबाव जरूर असावा. मी जर काही चुकीचं काम केलं तर कायद्याच्या दृष्टीकोनातून ते योग्य ठरणार नाही. त्यामुळे कायद्याची आणि काही प्रमाणात वरिष्ठांचा सकारात्मक दबाव असावा. मात्र नकारात्मक दबाव असू नये असं मला वाटते. कारण त्यामुळे प्रशासकीय अधिकारी पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. (हाच प्रश्न मोरे सरांनीही पुन्हा विचारला.)

मोरे सर- Nanotechnology चे applications सांगा.

मी- सर Nanotechnology रेणू स्तरावर काम करते. अतिशय सूक्ष्म पातळीवर काम करत असल्याने बहुतेक क्षेत्रात याचा फायदा होणार आहे. उदा. मोठ्या संगणकाची जागा अतिशय छोटा संगणक घेईल जो हाताळायला सुलभ असेल. ठराविक आजारावर उपचार ठरणारे naobots तयार करता येतील, जे थेट infected पेशींना टार्गेट करतील.

मोरे सर- तुम्ही blood donation camp organise करता. किती केले आत्तापर्यंत?

मी- सर चार camp केले.

मोरे सर- Blood चे component सांगा.

मी- सर RBC, WBC आणि platlates.

मोरे सर- त्यांचा life span किती?

मी- RBC- १२० दिवस, WBC-४-५ दिवस platelates १० दिवस असा त्यांचा life span आहे.

मोरे सर- Donate केल्यानंतर blood component separate केले जातात का?

मी- हो सर. Blood donate केल्यानंतर component separate केले जातात.

मोरे सर- Platelates चा role काय?

मी- रक्त गोठवण्यासाठी platelates चा उपयोग होतो.

मोरे सर- अजून काय role आहे?

मी- Sorry sir, मला माहित नाही.

मोरे सर- (इतर दोन सदस्यांकडे पाहत) ठीक आहे. तुम्ही येऊ शकता.

जॉईन करा @eMPSCkatta