Get Mystery Box with random crypto!

Pratik Bhad

Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad P
Logo of telegram channel pratikbhad9422 — Pratik Bhad
Channel address: @pratikbhad9422
Categories: Uncategorized
Language: English
Country: India
Subscribers: 10.05K
Description from channel

Dedicated to Current Affairs with respect to G.S.
#Mpsc #Combine #PSI #STI #ASO #UPSC #IB #SSC #PoliceBharati #CurrentAffairs #चालुघडामोडी #Chalughadamodi
Contact - 8625861698

Ratings & Reviews

3.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


The latest Messages 40

2021-02-14 07:44:40 डॉ. राणी बंग यांचा लॅन्सेट कडून सन्मान

महिला प्रजोत्पादन आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर राणी बंग यांच्या कार्याची दखल लॅन्सेट या जागतिक आघाडीच्या वैद्यकीय नियतकालिकाने घेतली आहे.
डॉक्टर राणी आणि डॉक्टर अभय बंग यांनी महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या अत्यंत दुर्गम भागातील लोकांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आपल्या वैवाहिक जीवनाची 43 वर्षे व्यतीत केले आहे अशा शब्दात लॅन्सेट ने डॉक्टर बंग दाम्पत्याचा सन्मान केला आहे.
745 viewsPratik Bhad, edited  04:44
Open / Comment
2021-02-12 11:47:52 Very Important

मराठी भाषा विभाग पुरस्कार

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार - रंगनाथ पठारे
(स्वरूप- 5 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र)

श्री पू. भागवत पुरस्कार - शब्दालय प्रकाशन
(स्वरूप- 3 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र)

मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार -डॉ. सुधीर रसाळ

कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार - संजय जनार्धन भगत आणि मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश
1.6K viewsPratik Bhad, 08:47
Open / Comment
2021-02-10 17:46:07 Departmental Psi 2017 final result
2.3K viewsPratik Bhad, edited  14:46
Open / Comment
2021-02-10 07:33:31 निधन वार्ता - राजीव कपूर

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे मंगळवारी 9 फेब्रुवारी 2021 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
ते 58 वर्षाचे होते.
अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या राजीव कपूर यांनी 1981 झाली वडील राज कपूर यांच्या हाताखाली 'प्रेमरोग' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती.
1983 साली त्यांनी 'एक जान है हम' या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले.
1984 झाली प्रदर्शित झालेला राज कपूर दिग्दर्शीत 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात त्यांना नायकाची मुख्य भूमिका मिळाली.
1990 साली प्रदर्शित झालेला 'जिम्मेदार' हा त्यांचा अभिनेता म्हणून अखेरचा चित्रपट मानला जातो.
चित्रपटातून स्वतःला गेली 30 वर्षे दूर ठेवणाऱ्या राजीव कपूर यांनी आशुतोष गोवारीकर यांची निर्मिती असलेल्या 'तुळशीदास ज्युनिअर' या चित्रपटातुन पुनरागमन करणार होते. त्यांचा हा अखेरचा चित्रपट ठरला आहे.
2.2K viewsPratik Bhad, 04:33
Open / Comment
2021-02-09 11:46:54 फुलपाखरांसाठी राखीव वनक्षेत्र

फुलपाखरांचे संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वन विभागातर्फे पहिल्यांदाच फुलपाखरांसाठी राखीव वनक्षेत्र निश्चित करण्यात येणार आहे.
सातारा वन क्षेत्रातील महादरे या जंगलाची यासाठी निवड करण्यात आली असून, या वनक्षेत्राला फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्राचा (कंझर्वेशन रिझर्व्ह) दर्जा मिळणार आहे.
या संदर्भातील प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
राज्याचे मानचिन्ह, राज्यवृक्ष, राज्यपक्षी यांच्या धर्तीवर 'ब्ल्यू मॉरमॉन' ला राज्याचे फुलपाखरू निश्चित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.
याच धर्तीवर फुलपाखरांसाठी राखीव वनक्षेत्र जाहीर करण्यातही महाराष्ट्र बाजी मारण्याची शक्यता आहे.
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या बैठकीत सातारा कोकणपट्ट्यातील काही जंगल पट्ट्यांना कंझर्वेशन रिझर्व चा दर्जा जाहीर केला.
जोरजांभळी जंगल पक्षी संवर्धनाच्या उद्देशाने राखीव वनक्षेत्र जाहीर केले.
आता फुलपाखरू संवर्धनासाठी महादरे जंगलाचे नाव प्रस्तावित आहे.

महादरेच्या जंगल विषयी

सातार्‍याजवळ यवतेश्वर पठारा जवळ महादरे वनक्षेत्र विस्तारले आहे.
पश्चिम घाटात फुलपाखरांच्या सुमारे 347 प्रजाती आहेत, महादरेच्या जंगलात 178 पेक्षा अधिक फुलपाखरांच्या प्रजाती दिसतात.
'व्हाईट टिप्ड लाईन ब्लू' आणि 'ऑर्किड टीट' यांचा वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार सर्वाधिक सुरक्षित असलेल्या प्रजातींमध्ये (शेड्युल्ड वन) समावेश होतो.
या दोन्ही प्रजाती बरोबरच इतर वैविध्यपूर्ण फुलपाखरे या क्षेत्रात आहेत.
2.0K viewsPratik Bhad, 08:46
Open / Comment
2021-02-07 15:35:29 उत्तर- 2

तामिळनाडू ने यावेळी गुजरात राज्याला मागे टाकले आहे.
2019 मध्ये भारताचे (सागरी) मत्स्यउत्पादन - 3.56 दशलक्ष टन
2019 मध्ये महाराष्ट्राचे (सागरी) मत्स्यउत्पादन - 2.01 लाख टन. (देशात 7 वा क्रमांक)
देशात सर्वाधिक उत्पादन -
1) तामिळनाडू
2) गुजरात
3) केरळ
महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन -
1) मुंबई
2) रायगड
3) रत्नागिरी
2.3K viewsPratik Bhad, 12:35
Open / Comment
2021-02-07 07:55:48 आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे 'भारतरत्न पं. भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन' या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
2.1K viewsPratik Bhad, 04:55
Open / Comment
2021-02-06 10:37:13 नमस्कार, विद्यार्थीं मित्रांनो..

आपल्या "चालू घडामोडी प्रश्न सराव टेस्ट सिरीज" ला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार.

आज नोव्हेंबर 2020 वरील (पेपर क्र.27) Upload करत आहे.

नोव्हेंबर 2020 महिन्याच्या टेस्ट पासून आपण

'2 The Point'
या दर्जेदार आणि परिक्षाभिमुख मासिकावर प्रश्न काढणार आहोत.

नोव्हेंबर 2020 पासून पुढील टेस्ट @pratikbhad9422 या टेलिग्राम चॅनेल वर मोफत उपलब्ध होतील.
धन्यवाद...

आपलाच,
प्रतिक भड
@pratikbhad9422
(8625861698)
2.9K viewsPratik Bhad, 07:37
Open / Comment