🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _______ भारतीय | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______
भारतीय कुस्तीपटूंची तिहेरी सुवर्णकमाई
17 April 2021 स्पर्धावाहिनी
════════════════════
वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धा
• भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगट आणि अंशू मलिक यांनी शुक्रवारी वरिष्ठ आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
• टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या या दोघींनी कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याची किमया साधली. याव्यतिरिक्त दिव्या काकराननेसुद्धा सुवर्णपदक पटकावले, मात्र अनुभवी साक्षी मलिकला रौप्यावर समाधान मानावे लागले.
विनेश फोगट:
• महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील अंतिम लढतीत विनेशने चायनीज तैपईच्या मेंड सुआन-सेईवर ६-० असा विजय मिळवला. यापूर्वी आशियाई स्पर्धेत तीन वेळा रौप्यपदकावर समाधान मानणाऱ्या विनेशने अंतिम फेरीत एकही गुण न गमावता तांत्रिक गुणांआधारे सुवर्णपदक जिंकले.
• विनेश फोगट ही भारतीय कुस्तीपटू आहे. आशियाई खेळ व कॉमन वेल्थमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. याव्यतिरिक्त, ती लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी नामांकित होणारी पहिली भारतीय खेळाडू होती.
• २०१६ मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कार, २०२० मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे.
अंशू मलिक:
• हरयाणाच्या १९ वर्षीय अंशूने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात मोंगोलियाच्या बत्सेत अटसेगला ३-० असे नमवले. पंचांनी बत्सेतला विविध चुकांसाठी तीन वेळा ताकीद देऊनही तिचा खेळ न सुधारल्यामुळे अंशूला विजयी घोषित करण्यात आले. उपांत्य फे रीत अंशूने तांत्रिक गुणांच्या आधारे क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या सेव्हारा एशमुराटोव्हाला पराभूत केले.
दिव्या काकरान:
• महिलांच्या ७२ किलो वजनी गटात दिव्याने कझाकस्तानच्या झामिला बर्गेनोव्हावर ८-५ अशी मात केली. दिव्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. गतवर्षी दिव्याने ६८ किलो वजनी गटात अजिंक्यपद मिळवले होते
स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini