Get Mystery Box with random crypto!

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _______ लिंगभाव | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_______
लिंगभाव संवाद कार्यक्रमाचा शुभारंभ
17 April 2021 स्पर्धावाहिनी
════════════════════
लिंगभाव संवाद कार्यक्रम हा दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती मिशन (डीएवाय-एनआरएलएम) आणि अर्थव्यवस्थेत महिला आणि मुलींच्या प्रगतीसाठी काय काम केले जाऊ शकते (आयडब्ल्यूडब्ल्यूएजीई) या उपक्रमाचा एक संयुक्त प्रयत्न असून, या प्रयत्नांमधून समोर येणारे अनुभव एकाच व्यासपीठावर सामायिक करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
लिंगभाव संवाद कार्यक्रम राज्यांना खालील संधी प्रदान करतो:
• महिला संस्थाच्या सुधारणांसाठी इतर राज्यांनी हाती घेतलेल्या चांगल्या कार्यपद्धती / उपक्रम समजून घेणे (उदा. महिलांना सुलभरीत्या जमिनीचे हक्क मिळणे, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) मध्ये त्यांचा सहभाग, अन्न, पोषण, आरोग्य आणि पाणी आणि स्वच्छता (एफएनएचडब्ल्यू) यासाठी उत्तम कार्यपद्धती, सार्वजनिक सेवा पुरवण्यासाठी मजबूत संस्था स्थापन करण्यासाठी, आणि महिलांमधील असुरक्षित गटांचे संरक्षण आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी;
• जागतिक स्तरावरील लिंगभाव समस्या/प्रश्न समजून घेणे;
• मुद्दे/अंमलबजावणीतील अडथळे कसे हाताळावेत यासंदर्भातील सूचनांसह तज्ञ आणि इतर सहकाऱ्यांसोबत सल्लामसलत;
• देशातील / इतर देशांमधील लिंगभाव विषयक प्रश्नांवरील सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यासाठी हातभार;
• सध्या सुरू असलेल्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरूवात झाली. या ऑनलाइन कार्यक्रमात तज्ञांचे एक पॅनेल देखील होते. याव्यतिरिक्त, स्थानिक स्तरातील महिलांनी आपले अनुभव देखील सांगितले.
• 2016 मध्ये, डीएवाय-एनआरएलएमने मुख्य प्रवाहातील लिंगभाव विषयक समस्यांच्या समाधानाकरिता एक लिंग परिचालन रणनीती देखील तयार केली, ज्यात लिंगभाव विषयक मुद्द्यांवरील कर्मचारी, संस्था यांना प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला.

स्रोत : PIB
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
════════════════
Join : @spardhavahini