Get Mystery Box with random crypto!

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _________ पुष् | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_________

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदी
05 July 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• उत्तराखंडचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी शपथ घेतली.
त्यांच्यासोबत पूर्वीच्या तीरथसिंह रावत मंत्रिमंडळातील 11 सदस्यांचाही शपथविधी झाला.
• राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी धामी व त्यांच्या सहकाऱ्यांना पदाची शपथ दिली.
• तिरथसिंह रावत हे नेमणूक झाल्यापासून 6 महिन्यात राज्य विधानसभेचे सदस्य होऊ न शकल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते.

कोण आहेत पुष्कर सिंह धामी?
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत ते 1990 पासून काम करत आहेत.
• पूर्व मुख्यमंत्री भगतसिंह कोश्यारी यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडलेली आहे.
• ते कुमाऊ भागातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
• वयाच्या 41 व्या वर्षी मुख्यमंत्री होणारे ते उत्तराखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले आहेत.


स्रोत : लोकसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini