🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini ___________ नव | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
___________

नव्या विद्युत वाहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
05 July 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि विद्युत वाहनांच्या नव्या उद्योगाला व त्यातून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्यात नवे विद्युत वाहन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत रविवारी मंजुरी देण्यात आली.
• पुढील तीन वर्षांसाठी हे धोरण लागू असून विद्युत वाहन- बॅटरीचा प्रकल्प सुरू करणाऱ्या कं पन्यांना डी प्लस गटातील वस्तू व सेवा कराचा १५० टक्के परतावा देण्याची सवलत देण्यात येणार आहे.
• विद्युत वाहन हा उद्योग आगामी काळातील मोठा व्यवसाय ठरणार असल्याने त्याबाबतची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यात नवे विद्युत वाहन धोरण जाहीर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

काय आहे नव्या धोरणात?
• राज्यात सध्या सुमारे ४० हजार विद्युत वाहने आहेत. आता विद्युत वाहनांच्या उत्पादनाला, खरेदीला व दैनंदिन वापरासाठीच्या चार्जिंग के द्रांना अशा सर्व पातळीवर सवलती व अनुदान हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे.
• विद्युत रिक्षा, विद्युत टॅक्सी यांना परवान्याची गरज असणार नाही.
• ओला, उबरसारख्या टॅक्सीसेवा आणि घरपोच सेवांसाठी विद्युत वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
• केवळ चारचाकी नव्हे तर दुचाकी विद्युत वाहनांनाही गटनिहाय १५ हजारांपेक्षा अधिक अनुदान देण्यात येणार आहे.

स्रोत : लोकसत्ता, द हिंदू
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini