🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _____________ | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
07 July 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
• राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कानिटकर यांची नियुक्ती जाहीर केली.

ले. ज. डॉ. माधुरी कानिटकर
• सध्या त्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख ( वैद्यकीय ) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
• डॉ. कानिटकर यांनी पुणे येथील सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
• बालरोगशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
• २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले. त्यांना अध्यापन व संशोधनाचा २२ वर्षांचा अनुभव आहे.
• आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले होते.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ
• महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान व वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे.
• याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.
• हे विद्यापीठ महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नियम, १९९८" नुसार १९९८ साली स्थापन झाले.
• महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात

स्रोत : लोकसत्ता, वकिपीडिया
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini