🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

DAILY CURRENT ANALYSIS by Team Spardhavahini _____________ | स्पर्धावाहिनी

DAILY CURRENT ANALYSIS
by Team Spardhavahini
_____________

शिरीषा बांदला बनणार अवकाशवीर
07 July 2021 स्पर्धावाहिनी
══════════════
• आंध्र प्रदेशात गुंटूर येथे जन्मलेली शिरीषा बांदला ही लवकरच 'अवकाशवीरांगना' ठरणार आहे.
• रिचर्ड ब्रॅन्सन या अब्जाधीश अवकाश उद्योजकाच्या 'व्हर्जिन गॅलेक्टिक' या अवकाश यानातून ती 11 जुलैला अवकाशात झेपावणार आहे.
• एकूण सहा जण या मोहिमेत समाविष्ट आहेत. यात काही प्रयोगही केले जाणार आहेत असे सांगण्यात येते.
• भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही संस्था 2022-23 पर्यंत भारतीय महिलेला अवकाशात पाठवणार आहे. याआधी राकेश शर्मा ( रशियन भारतीय मोहीम) व सुनीता विल्यम्स (नासा) यांनी आधीच अवकाश गाठले होते, तर ‘नासा' च्या कोलंबिया दुर्घटनेत कल्पना चावला मरण पावली होती.

कोण आहे शिरीषा बांदला?
• 34 वर्षाची शिरीषा ही जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या 2015 च्या तुकडीमधील 'एमबीए' आहे.
• त्याआधी परड्यू विद्यापीठातून एरोस्पेस इंजिनीअरिंग प्रशिक्षण घेतले असल्याने, 'व्हर्जिन गॅलॅक्टिक' या ब्रिटिश-अमेरिकन अवकाशयान कंपनीच्या सरकारी कामकाजविषयक विभागाच्या त्या उपाध्यक्ष आहेत.
• शिरीषा वयाच्या चौथ्या वर्षी अमेरिकेला गेली व टेक्सासमध्ये वाढली.

स्रोत : लोकसत्ता
संकलन : (टीम स्पर्धावाहिनी )
दिगंबर आधुरे (ASO), राजेश देशमुख (STI)
══════════════
Join : @spardhavahini