Get Mystery Box with random crypto!

जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती पश्चिम बंगालचे माज | स्पर्धावाहिनी

जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

उपराष्ट्रपती पदाची निवडणूक:
७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता.
या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते.
धनखड यांना मिळालेल्या एकुण मतांची टक्केवारी ७३ एवढी होती.

जगदीप धनखड:
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला.

धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली. ते १९८९ मध्ये झुंझुनूमधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९८९ ते १९९१ या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलने जगदीप धनखड यांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले.
२००३ मध्ये त्यांचे काँग्रेसमध्येही मदभेद झाले आणि त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.


---------------------
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...

http://shorturl.at/kJPV7